--Advertisement Here--

Ajit Pawar | फुरसुंगी–उरुळी देवाचीतील खराब रस्त्यांवर तीव्र नाराजी; ‘पालकमंत्री म्हणून लाज वाटली…’

On: December 25, 2025 3:42 PM
Follow Us:
Ajit Pawar | फुरसुंगी–उरुळी देवाचीतील खराब रस्त्यांवर तीव्र नाराजी; ‘पालकमंत्री म्हणून लाज वाटली…’
--Advertisement Here--

रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक कोंडीवर संताप

फुरसुंगी आणि उरुळी देवाची परिसरातील अत्यंत खराब रस्त्यांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही. लोक अशा रस्त्यांवरून कसे प्रवास करतात, याचेच आश्चर्य वाटते. ही अवस्था पाहून पालकमंत्री Ajit Pawar म्हणून माझी मलाच लाज वाटली,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

रस्त्यांची बिकट स्थिती, वाढती वाहतूक कोंडी आणि लोकसंख्येचा ताण यावर बोलताना पवार म्हणाले की, परिसराचा विकास वेगाने होत असला तरी प्रशासनावर त्याचा मोठा भार पडत आहे. योग्य नियोजनाशिवाय विकास झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

रोड शोदरम्यान स्थानिक पदाधिकारी उपस्थित

या पाहणीदरम्यान हडपसरचे आमदार व प्रभारी चेतन तुपे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष सरोदे, माजी नगरसेवक गणेश ढोरे, अमोल हरपळे यांच्यासह सर्व प्रभागांतील उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते. हा रोड शो उरुळी देवाची फाटा येथून सुरू होऊन मंतरवाडी–फुरसुंगी गावठाण मार्गे पुढे जात भेकराईनगर बस डेपो येथे संपन्न झाला.

नवीन महापालिका स्थापन करण्याची गरज – अजित पवार

Ajit Pawar म्हणाले, “पिंपरी-चिंचवड पूर्वी नगरपालिका होती. लोकसंख्या वाढल्यानंतर ती महापालिका झाली आणि आज मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. त्याच धर्तीवर हडपसर, मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची, नगर रोड, वाघोली, लोणी काळभोर, उरुळी कांचन, होळकरवाडी, उंड्री-पिसोळी, वडकी या सर्व भागांना एकत्र करून नवीन महापालिका स्थापन करणे अत्यावश्यक आहे.”

जेजुरी सभेत विकासावर भर देण्याचे आवाहन

यापूर्वी जेजुरी येथे झालेल्या सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागरिकांना विकासाभिमुख मतदान करण्याचे आवाहन केले. “मत देताना जात-पात पाहू नका. उमेदवाराची विकासदृष्टी, कार्यक्षमता आणि कर्तृत्व पाहा. जेजुरी शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सक्षम उमेदवार निवडणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

या सभेला माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, जालिंदर कामठे, संभाजी झेंडे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई तसेच प्रभागातील सर्व उमेदवार उपस्थित होते.

Alos Read :

Pune : अल्पवयीन मुलीचा अंतरराज्य शोध मोहीम यशस्वी; फुरसुंगी पोलिसांनी युवक व सावत्र आईला ताब्यात घेतले

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment