--Advertisement Here--

Fursungi-Uruli Devachi नगरपरिषद निवडणूक; अजित पवार गटाला 32 पैकी 19 जागांवर दणदणीत विजय

On: December 25, 2025 3:35 PM
Follow Us:
Fursungi-Uruli Devachi नगरपरिषद निवडणूक; अजित पवार गटाला 32 पैकी 19 जागांवर दणदणीत विजय
--Advertisement Here--

Fursungi-Uruli Devachi – संतोष सरोदे नगराध्यक्ष.?

फुरसुंगी–उरुळी देवाची Fursungi-Uruli Devachi नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी घवघवीत यश मिळवत 32 पैकी 19 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयासह राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष सरोदे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या Fursungi-Uruli Devachi निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ला 8 जागा तर भारतीय जनता पार्टीला 5 जागांवर समाधान मानावे लागले. एकूण 8 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली.

Fursungi-Uruli Devachi नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने ती अत्यंत चुरशीची ठरली. Fursungi-Uruli Devachi नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी 120 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी सर्व 32 जागांवर उमेदवार उभे केले होते. Fursungi-Uruli Devachi एकूण 16 वार्डांमध्ये निवडणूक झाली असून नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते.

Pune Metro: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! 23.3 कि.मी.ची तिसरी मेट्रो मार्गिका ‘या’ तारखेला सुरू होणार; वाहतूक कोंडीतून कायमची सुटका

मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली. सुरुवातीपासूनच अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. निकाल धक्कादायक ठरले असून अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला आहे. Fursungi-Uruli Devachi नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संतोष सरोदे यांना 20,908 मते, तर शिवसेना (शिंदे गट) चे महेंद्र सरोदे यांना 18,010 मते मिळाली. उबाठा शिवसेनेचे सनी कांबळे यांना 6,055 मते मिळाली.

Nagarpalika Nagarparishad Nagarpanchayat Winner : गावचे कारभारी ठरले! 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment