PCMC महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादीकडून जोरदार हालचाली; Rahul Kalate – मुंबईत बुधवारी प्रवेशाची चर्चा
PCMC, १७ डिसेंबर २०२५: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक पातळीवरील नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राष्ट्रवादी) सक्रिय झाले असून प्रभावशाली नेत्यांशी संपर्क वाढवण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक Rahul Kalate हे सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विविध राजकीय पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरुवातीला चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मात्र अलीकडेच कळाटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठका घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल तानाजी कलाटे हे बुधवारी मुंबईत अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा प्रवेश सोहळा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या संदर्भात संपर्क साधला असता Rahul Kalate यांनी थेट भूमिका स्पष्ट करण्याचे टाळले. “तुम्ही जे विचार करत आहात, तेच होणार आहे,” असे सूचक विधान त्यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असलेले Kalate पाच वर्षे गटनेते म्हणून कार्यरत होते. अलीकडेच त्यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती आणि ते शरद पवार गटाशी संबंधित मानले जातात.
विरोधी पक्षातील नगरसेवक म्हणून त्यांनी वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील खराब रस्ते, पाणीटंचाई, शहर विकास आराखडा, वाढते अपघात, तसेच पुलांच्या रखडलेल्या कामांवर सातत्याने आवाज उठवला होता. जर राहुल तानाजी कलाटे चा भाजप प्रवेश निश्चित झाला, तर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेकडे आणि त्यांनी उपस्थित केलेल्या नागरी प्रश्नांवर सत्ताधारी पक्ष कसा तोडगा काढतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.








