फुरसंगी : पुण्याच्या पूर्वेकडील उपनगरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनारपूल–निर्मलवस्ती परिसरात एका शेतकऱ्याच्या घराच्या टिनच्या छपरावर बिबट्या बसलेला दिसल्याची घटना उघडकीस आली.
सकाळच्या सुमारास घडलेल्या या Fursungi प्रकारामुळे परिसरातील लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली. जरी बिबट्याने कुणावरही हल्ला केलेला नसला तरी निवासी भागात त्याची सततची वर्दळ चिंतेचा विषय ठरत आहे.
पुणे शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार आणि वनक्षेत्राशी कमी होत जाणारा संपर्क यामुळे गेल्या काही वर्षांपासून पूर्वेकडील भागात बिबट्यांचे दर्शन वाढले आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेत गस्त वाढविण्याच्या तसेच संवेदनशील भागांमध्ये निरीक्षण ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन परिसरात अतिरिक्त पिंजरे लावण्याचाही विचार केला जात आहे.
Sanjeev Kapoor Net Worth 2025: यहाँ से देखिए कितनी सम्पत्ति के मालिक हैं शेफ़ संजीव कपूर
रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर न फिरण्याचे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन Fursungi प्रशासनाने नागरिकांना केले आहे. दरम्यान, फुरसंगी रहिवाशांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावण्याची आणि बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
Also Read :
फुरसुंगी–उरुळी देवाची : स्वतंत्र नगरपालिकेची मागणी पुन्हा जोरात








