--Advertisement Here--

९९व्या Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan मध्ये शहरी-ग्रामीण ९९ विद्यार्थी घडवणार सांस्कृतिक इतिहास

On: December 28, 2025 3:47 PM
Follow Us:
९९व्या Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan मध्ये शहरी-ग्रामीण ९९ विद्यार्थी घडवणार सांस्कृतिक इतिहास
--Advertisement Here--

जय जय महाराष्ट्र माझा’ राज्यगीत आणि ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थनेचे सामूहिक सादरीकरण – Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, शूरवीरांचा पराक्रम आणि मानवतेचा (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) संदेश अधोरेखित करणारा एक ऐतिहासिक क्षण साताऱ्यात साकार होणार आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात शहरी आणि ग्रामीण भागातील ९९ विद्यार्थी एकत्र येऊन ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आणि साने गुरुजी लिखित ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना सामूहिकरित्या सादर करणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) महामंडळाच्या वतीने आयोजित हे साहित्य संमेलन दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे होणार असून, शतकपूर्व संमेलन विशेष व संस्मरणीय ठरावे यासाठी संयोजकांनी विविध अभिनव उपक्रम राबवले आहेत. उद्घाटन समारंभात संमेलनगीतासह राज्यगीत आणि प्रार्थनेचे सामूहिक सादरीकरण हा त्यातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारातून ही संकल्पना साकार होत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विनोद कुलकर्णी व संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली समूहगीत (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे प्रमुख राजेश जोशी असून, समन्वयक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी सुजीत शेख कार्यरत आहेत.

या अभिनव उपक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील २५ शाळांमधून आठवी ते बारावीतील ९९ विद्यार्थ्यांची निवड संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे.

साताऱ्यात १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) संमेलनासाठी अभिनव सांस्कृतिक उपक्रम

खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेची नव्या चालीत संगीतबांधणी संगीततज्ज्ञ राजेंद्र आफळे यांनी केली असून, त्यांना बाळासाहेब चव्हाण, संगीत संशोधक डॉ. स्वरदा राजोपाध्ये, ज्येष्ठ संगीत शिक्षिका वर्षा जोशी, ज्येष्ठ शाहीर भानुदास गायकवाड यांच्यासह संमेलनगीताचे गीतकार राजीव मुळ्ये, तसेच सचिन राजोपाध्ये, मिलिंद देवरे, सचिन शेवडे यांचे सहकार्य लाभले आहे.

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय

या उपक्रमात छत्रपती शाहू अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (पुणे), डेक्कन एज्युकेशन सोसायटी (पुणे) यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, शारदाबाई पवार आश्रम शाळा, यशोदा शिक्षण संस्था, पोदार इंग्लिश मिडियम स्कूल आदी शाळांचा सहभाग आहे.

स्वतंत्र संगीत शिक्षक उपलब्ध नसतानाही ग्रामीण भागातील शाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, शहरी भागातील शाळांमधील संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक प्रभावी ठरत आहे. हा उपक्रम शहरी-ग्रामीण सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरणार असल्याचे मत संयोजकांनी व्यक्त केले आहे.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment