--Advertisement Here--

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमान (Temperatures) एक अंकी पातळीवर

On: January 18, 2026 3:00 PM
Follow Us:
पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमान (Temperatures) एक अंकी पातळीवर
--Advertisement Here--

पुणे, 10 जानेवारी 2026 : पुणे शहरात थंडीचा कडाका कायम असून सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमान (Temperatures) एक अंकी पातळीवर नोंदवले गेले आहे. गेल्या 24 तासांत तापमानात किंचित वाढ झाली असली तरी थंडीची तीव्रता कायम असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या नोंदींनुसार 8 जानेवारी रोजी किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअस होते.

तर 9 जानेवारी रोजी ते आणखी घसरून 8.4 अंश सेल्सिअसवर पोहोचले, ही या थंडीच्या लाटेतील आतापर्यंतची सर्वात थंड रात्र ठरली. 10 जानेवारी रोजी तापमान थोडे वाढून 9.4 अंश सेल्सिअस झाले, मात्र ते अद्याप 10 अंशांच्या खालीच राहिले.

सलग कमी तापमानामुळे शहरात पहाटेच्या वेळी (Temperatures) गारवा प्रकर्षाने जाणवत आहे. उघड्या भागांमध्ये तसेच उपनगरांमध्ये थंडीचा जास्त प्रभाव जाणवत असून उरुळी देवाची आणि फुरसुंगी परिसरात पहाटेच्या वेळेस अधिक थंडी व काही ठिकाणी धुक्यासारखी स्थिती अनुभवास आली. नागरिकांनी उशिरा रात्री आणि पहाटेच्या वेळेस थंडी अधिक जाणवत असल्याचे सांगितले.

हवामान (Temperatures) विभागाचा अंदाज व नागरिकांना सूचना

हवामान तज्ज्ञांच्या मते, किमान तापमानातील (Temperatures) ही किरकोळ वाढ तात्पुरती असून त्यामुळे थंडीची लाट संपल्याचे संकेत मिळत नाहीत. स्वच्छ आकाश आणि कोरडे उत्तरेकडील वारे यामुळे रात्रीचे तापमान कमी राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसांतही अशीच थंड हवामानस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना, पहाटे व रात्रीच्या वेळेस आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उबदार कपडे वापरणे, थंड वाऱ्यापासून संरक्षण घेणे आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment