--Advertisement Here--

पुण्यात 19th January 2026 ला शाळा-कॉलेजांना सुट्टी; कार्यालयांना सुटी देण्याचे आवाहन; पुणे ग्रँड चॅलेंज टूर

On: January 18, 2026 3:15 PM
Follow Us:
पुण्यात 19th January 2026 ला शाळा-कॉलेजांना सुट्टी; कार्यालयांना सुटी देण्याचे आवाहन; पुणे ग्रँड चॅलेंज टूर
--Advertisement Here--

19 ते 23 जानेवारीदरम्यान पुणे शहरात पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून अनेक प्रमुख रस्ते तात्पुरते बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने 19 जानेवारी रोजी पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. {19th january 2026 declared holiday}

दरम्यान, 19 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सायकल रॅलीमुळे जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे कार्यालयांनी शक्य असल्यास सुटी द्यावी किंवा मेट्रो व पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. {19th january 2026 declared holiday}

बजाज पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा

बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा नसून पुढील पिढ्यांसाठी टिकणारा क्रीडा व पायाभूत वारसा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेच्या उद्घाटन व आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग उपस्थित होते. {19th january 2026 declared holiday}

पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर – पुणे ग्रँड चॅलेंज टूर

पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असून, प्रत्येक किलोमीटरवर शौर्य व परंपरेच्या कथा अनुभवायला मिळतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असून, पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ला वेगळी ओळख देईल, असे त्यांनी नमूद केले.

ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल आणि यामुळे पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. स्पर्धेसोबत पूरक उपक्रमांद्वारे पर्यटकांना निसर्गासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घडेल, असेही त्यांनी सांगितले. {19th january 2026 declared holiday}

‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांच्या जलद आणि जागतिक दर्जाच्या तयारीचे विशेष कौतुक केले. {19th january 2026 declared holiday}

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment