--Advertisement Here--

फुरसुंगी–उरुळी देवाची (FUDMC) नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ओंकार कामठे विजयी

On: January 18, 2026 3:49 PM
Follow Us:
फुरसुंगी–उरुळी देवाची (FUDMC) नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ओंकार कामठे विजयी
--Advertisement Here--

फुरसुंगी–उरुळी देवाची (FUDMC) नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ओंकार कामठे निवडून

फुरसुंगी–उरुळी देवाची (FUDMC) नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओंकार मच्छिंद्र कामठे यांनी स्पष्ट बहुमताने बाजी मारली. गुरुवारी (ता. 15) नगराध्यक्ष संतोष फकीरा सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक सहायक म्हणून मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी कामकाज पाहिले.

उपनगराध्यक्षपदासाठी ओंकार कामठे आणि शिवसेनेच्या नगरसेविका राणी बाळासाहेब हरपळे यांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत दोन्ही अर्ज वैध ठरले आणि कोणतीही माघार न घेतल्याने प्रत्यक्ष मतदान झाले. या निवडणुकीत भाजपाचे पाच नगरसेवक अनुपस्थित होते.

20 विरुद्ध 8 मतांनी विजय; FUDMC निवडीनंतर समर्थकांचा जल्लोष

मतदानात ओंकार कामठे यांना नगरसेवकांची 19 मते आणि नगराध्यक्षांचे एक मत असे एकूण 20 मते मिळाली, तर राणी हरपळे यांना 8 मते मिळाली. त्यामुळे ओंकार कामठे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष संतोष सरोदे यांनी केली. निकाल जाहीर होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, फुरसुंगी–उरुळी देवाची (FUDMC) नगरपरिषदेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) दमदार कामगिरी करत नगराध्यक्षपदासह 32 पैकी 19 जागांवर विजय मिळवला असून, नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment