--Advertisement Here--

Manasi Naik ची मध्यवर्ती भूमिका असलेला “मन आतले मनातले” चित्रपट 13 फेब्रुवारीला प्रदर्शित – उत्तम कथा आणि दमदार स्टारकास्टसह

On: February 17, 2026 11:27 AM
Follow Us:
Manasi Naik ची मध्यवर्ती भूमिका असलेला “मन आतले मनातले” चित्रपट 13 फेब्रुवारीला प्रदर्शित – उत्तम कथा आणि दमदार स्टारकास्टसह
--Advertisement Here--

Manasi Naik यांच्या प्रमुख भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या आशयसंपन्न मराठी चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडत आहे. दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या कथानकामुळे लक्ष वेधून घेणारा “मन आतले मनातले” हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

“मन आतले मनातले” : नावीन्यपूर्ण कथा आणि Manasi Naik दमदार स्टारकास्टसह मराठी चित्रपटसृष्टीत भव्य पदार्पण

Surya Film World प्रस्तुत मन आतले मनातले या चित्रपटाची निर्मिती Suren Mahapatra यांनी केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाची कथा आणि पटकथा लेखनही सुरेन महापात्रा यांनीच केले असून संवादलेखन Manoj Sudhakar Yeunkar यांनी केले आहे. दिग्दर्शनाची धुरा James Anthony यांनी सांभाळली आहे.

Yuzvendra Chahal से तलाक की खबरों पर Dhanashree का परिवार नाराज़, 60 करोड़ वाली अफवाह का सच जानिए

चित्रपटाला संगीताची साथ Abhijit Majumdar यांनी दिली असून गीतलेखन Dr. Sunanda Divare Palavankar यांचे आहे. छायांकन Sudarshan Senapati यांनी केले असून संकलनाची जबाबदारी मलया आणि बिपिन यांनी पार पाडली आहे.

या चित्रपटात Manasi Naik यांच्यासह Upendra Limaye, Ruturaj Phadke, Sandeep Gaikwad, Kamlesh Sawant, Arun Nalawade, Yatin Karyekar, Siya Patil, Rajesh Aher आणि Vinit Bhonde अशी दमदार आणि तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

अत्यंत नावीन्यपूर्ण कथानक आणि Manasi Naik दमदार स्टारकास्टमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. मनोरंजन सोबतच विचार करायला लावणारा आशय या चित्रपटात मांडण्यात आला असून, मानवी आयुष्याचे विविध पैलू आणि सूक्ष्म भावभावना प्रभावीपणे उलगडण्यात आल्या आहेत.

Surya Film World या निर्मिती संस्थेने यापूर्वी ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा विविध भाषांतील चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता “मन आतले मनातले” या चित्रपटाच्या माध्यमातून ही संस्था मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि दर्जेदार चित्रपट सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment