उरुळी देवाची येथील ग्रामस्थ बंधूंना विनंती करत स्थानिक नगरसेवक प्रशांत भाडळे पाटील (Prashant Bhadale Patil) यांनी महारवतन जमिनी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. संबंधित सर्वे नंबर 110, 111, 222, 223, 224, 25, 26, 150 आणि 219 या जमिनींबाबत तहसीलदार कार्यालयाकडून नोटीस प्राप्त झाली आहे.
75% रक्कम भरण्याची अट – Prashant Bhadale Patil
या नोटीसमध्ये प्रत्येक प्लॉट धारकाने सरकारी किमतीच्या 75% रक्कम भरण्याबाबत नमूद करण्यात आले होते. मात्र, या नोटीसची सुनावणी अद्याप झालेली नसून, त्यामध्ये आपण अर्ज करून विलंब मागितला होता. त्यानुसार, आता वकिलांमार्फत अर्ज करून 24-04-2026 रोजी पुढील सुनावणी तारीख घेण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. पुढील तारीख सर्व ग्रामस्थांना लवकरच कळवण्यात येणार आहे.
प्रशांत भाडळे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही प्लॉट धारकाने घाबरून जाऊ नये. आपण कायदेशीर मार्गाने यावर तोडगा काढणार आहोत. सध्या महारवतन जमिनीवर अनेकांनी घरे बांधली असून, आपल्या कष्टाचा पैसा या गोष्टीत गुंतलेला आहे, त्यामुळे कोणालाही घरातून बाहेर काढले जाणार नाही किंवा वेठीस धरले जाणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला आहे.
या लढ्यात नगरसेवक विकास भाडळे, ग्रामपंचायत सदस्य विलास शेवाळे तसेच इतर अनेक ग्रामस्थ तुमच्या सोबत उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वांनी एक विचाराने आणि मोठ्या ताकदीने एकत्र येऊन, काही जणांनी केलेल्या खोडसाळपणा व नालायकपणाचा पर्दाफाश करून, महारवतन (म्हाडा) जमिनी या संकटातून बाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
शेवटी, सर्व ग्रामस्थांना एकत्र राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








