--Advertisement Here--

Pune Cyber Fraud News: व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

On: April 23, 2026 4:24 AM
Follow Us:
Pune Cyber Fraud News: व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक
--Advertisement Here--

Pune Cyber Fraud News: व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने ४८ लाखांची फसवणूक

Pune Cyber Fraud News : पुण्यात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढत असून, व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल आणि भीतीचे वातावरण निर्माण करून तब्बल ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी वानवडी, विश्रामबाग आणि काळेपडळ पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

वानवडी परिसरातील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची २५.४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपीने एका कंपनीच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार करून बँक खात्याचे तपशील बदलल्याची माहिती दिली आणि संबंधित रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली.

काळेपडळ परिसरात ६४ वर्षीय व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून १८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. आरोपींनी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचा दावा केला आणि बनावट अटक वॉरंट पाठवून पैसे उकळले.

Pune Metro: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! 23.3 कि.मी.ची तिसरी मेट्रो मार्गिका ‘या’ तारखेला सुरू होणार; वाहतूक कोंडीतून कायमची सुटका

त्याच भागातील ३५ वर्षीय तरुणाच्या मोबाईलवर आलेल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करताच त्याचा फोन हॅक करण्यात आला. त्यानंतर त्याच्या क्रेडिट कार्डवरून ३.५१ लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.दरम्यान, विश्रामबाग परिसरातील ५१ वर्षीय महिला व्यावसायिकाच्या बँक खात्यातूनही त्यांच्या नकळत १.३० लाख रुपये काढण्यात आले. या सर्व घटनांमुळे नागरिकांनी अनोळखी लिंक, ईमेल आणि कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment