--Advertisement Here--

ATMS Signal System In Pune | 200 कोटींची ‘ATMS’ सिग्नल यंत्रणा ठरली निष्प्रभ; स्मार्ट सिटी कंपनी व महापालिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

On: January 6, 2026 1:49 PM
Follow Us:
ATMS Signal System In Pune
--Advertisement Here--

रिक्षा, बसथांबे, बेकायदा पार्किंग व अतिक्रमणांमुळे वाहतूक सुधारण्यात ATMS Signal System अपयश

ATMS Signal System In Pune हा प्रकल्प शहरातील वाहतूक सुरळीत व गतीमान करण्यासाठी राबविण्यात आला होता. मात्र, स्मार्ट सिटी कंपनी आणि पुणे महानगरपालिकेने सुमारे 200 कोटी रुपये खर्चून उभारलेली ‘एटीएमएस’ (Adaptive Traffic Management System) सिग्नल यंत्रणा सध्या अपेक्षित परिणाम देण्यात अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना यावर्षी गुंडाळण्यात आली असली, तरी या योजनेअंतर्गत उभारलेल्या प्रकल्पांची कार्यक्षमता आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीने सुमारे चार वर्षांपूर्वी शहरातील 125 प्रमुख चौकांमध्ये 125 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक ATMS सिग्नल यंत्रणा बसवली. इंटरनेटवर आधारित सिग्नल नियंत्रण, कॅमेऱ्यांद्वारे वाहतुकीचा अंदाज घेऊन सिग्नल वेळ ठरवणे, वाहतूक कोंडी कमी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात हा उद्देश साध्य झालेला दिसत नाही.

विशेष म्हणजे, सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर पुढील पाच वर्षांचे संचालन व देखभाल (Operation & Maintenance) याच कंपनीकडे ठेवण्यासाठी दरवर्षी सुमारे 13 कोटी रुपये, म्हणजेच एकूण 65 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला होता. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर या प्रस्तावाला मंजुरी दिली.

प्रकल्प सुरू होऊन चार वर्षे उलटून गेल्यानंतरही ATMS Signal System पुण्यात प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे महापालिकेच्या पाहणीत स्पष्ट झाले. याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने सिग्नल सुरू असल्याचे मान्य केले, मात्र चौकांजवळील अनेक अडथळ्यांमुळे अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची कबुली दिली.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी की ‘टेंडर मलई’ साठी.? ATMS Signal System प्रकल्पावर संशय

कंपनीने दिलेल्या अहवालानुसार,

  • सिग्नलपासून 80 ते 100 मीटर अंतरावर PMPL बसथांबे व रिक्षा थांबे,
  • रस्त्याच्या कडेला बेकायदा दुचाकी व चारचाकी पार्किंग,
  • डिव्हायडर तोडून घेतलेले अनधिकृत U-Turn,
  • चौक परिसरातील अतिक्रमणे,

या सर्व कारणांमुळे वाहतूक मंदावते आणि चौकांमध्ये कोंडी होते. या अडचणींची छायाचित्रांसह माहिती महापालिका व वाहतूक पोलिसांना सादर करण्यात आली असून, अहवालाची प्रत उपलब्ध झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ATMS (Adaptive Traffic Management System) प्रकल्पाला मंजुरी देताना स्मार्ट सिटी कंपनी, महापालिका, पोलिस प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी योग्य अभ्यास केला होता का? की केवळ ठेकेदाराचे हित जपण्यासाठी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला? विरोधकांनीही सर्वसाधारण सभेत या खर्चावर ठाम भूमिका का घेतली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील वाहतूक सुधारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही ATMS Signal System In Pune निष्प्रभ ठरत असल्याने, या संपूर्ण प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment