Pune Crime : ‘व्हॉट्सॲप हॅक’ करून व्यावसायिकाला साडेसात लाखांचा गंडा

On: February 8, 2026 8:37 AM
Follow Us:
Pune Crime : 'व्हॉट्सॲप हॅक' करून व्यावसायिकाला साडेसात लाखांचा गंडा

PUNE CRIME – पिंपरी : व्यावसायिकाचे समाजमाध्यमातील व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून साडेसात लाख रुपये लंपास केल्याची घटना भोसरीमध्ये घडली आहे. ही घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शांतीनगर येथे घडली.

या प्रकरणी व्यावसायिकाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांचा भोसरी येथे व्यवसाय आहे. अज्ञात आरोपीने फिर्यादीचे यांचे व्हॉट्सॲप हॅक केले.

त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एका बँकेतील भोसरीतील शाखेच्या करंट खात्याची माहिती मिळवून ७ लाख ४१ हजार ६७१ रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Pune News : पुणे महापालिकेला दिलासा; फुरसुंगी, उरुळी देवाची बांधकामबाबत परवानगीचे अधिकार नगरपरिषदेवर

‘मी इथला भाई आहे’ म्हणत तरुणाची दहशत

PUNE CRIME : तू माझ्याकडे काय बघतोय, असे म्हणत एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करून परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (१ फेब्रुवारी) रात्री आठ वाजता रहाटणी फाटा येथे घडली.

PUNE CRIME या प्रकरणात १७ वर्षीय विद्यार्थ्याने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चहा पिण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांची कॉलर पकडून गालात चापट मारली. त्यानंतर कमरेचा कोयता काढून फिर्यादीच्या हाताच्या पंजावर वार करून जखमी केले.

आरोपीने कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे, जो मध्ये येईल त्याचा मुडदा पाडतो, अशी धमकी देत लोकांमध्ये दहशत निर्माण केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

गैरसमजातून चहाच्या गाड्यावर तरुणाला मारहाण

PUNE CRIME : मित्रासोबत चेष्टा-मस्करी करत असताना झालेल्या गैरसमजातून एका तरुणाला चहा-नाष्टा गाड्यावरील झाऱ्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना सोमवारी (२ फेब्रुवारी) पहाटे सहा वाजता वाकड ब्रिज खालील भुजबळ चौक येथे घडली.याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र हे बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे एकमेकांशी चेष्टा-मस्करी करत होते.

यावेळी ते एकमेकांना शिवीगाळ करत असताना, फिर्यादी हे त्याचा ओळखीचा असलेल्याशी भांडण करत असल्याचा समज आरोपीचा झाला आहेत. याच कारणावरून त्यांच्यात झटापट झाली आणि आरोपीने चहाच्या गाड्यावरील झाऱ्याने फिर्यादीच्या कपाळावर मारून त्यांना जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

PUNE CRIME : आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर बेकायदेशीरपणे कोयता बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (२ फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई नारायण सूर्यवंशी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील कसबे (३१, बर्गेवस्ती, चिंबळी. मूळ – फुरसुंगी, हवेली) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा इंद्रायणी नदीच्या घाटावर संशयास्पदरीत्या वावरत होता.

त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

मुलीचा विश्वास संपादन करून दोन लाखांचे दागिने लांबवले

PUNE CRIME : घरी येऊन ओळखीचा फायदा घेत मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान कासारवाडी येथील शास्त्रीनगर भागात घडली.

याबाबत ४१ वर्षीय व्यक्तीने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी फिर्यादीच्या मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर तिच्याकडून दोन लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पळून झाले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ही फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दापोडी पोलीस तपास करत आहेत.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment