--Advertisement Here--

Covid Yoddha Yunus Pathan joins ShivSena | कोविड योद्धा युनूस पठाण यांचा शिवसेनेत प्रवेश

On: January 6, 2026 3:22 PM
Follow Us:
Covid Yoddha Yunus Pathan joins Shiv Sena | कोविड योद्धा युनूस पठाण यांचा शिवसेनेत प्रवेश
--Advertisement Here--

Yunus Pathan यांच्या मुळे प्रभाग 23 मध्ये शिवसेनेचे बळ वाढणार; पिंपरी-चिंचवड राजकारणात हालचाली

पिंपरी-चिंचवड शहरात कोविड काळात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे कोविड योद्धा युनूस पठाण (Yunus Pathan) यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कोरोना महामारीच्या काळात गरजू नागरिकांसाठी केलेल्या सेवाभावी कार्यामुळे युनूस पठाण हे नाव शहरात परिचित आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

या कार्यक्रमाला प्रभाग 23 चे अधिकृत उमेदवार संतोष बारणे, संतोषी पवार, नेहा जगताप यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

युनूस पठाण यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड मधील प्रभाग 23 मध्ये राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#CovidYoddhaYunusPathan #ShivSenaJoinNews #Pimpri-ChinchwadPoliticalNews #Ward23ShivSena #MaharashtraPoliticalNewsMarathi

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment