--Advertisement Here--

Devendra Fadnavis | पुण्यात 80 हजार कोटींच्या विकासकामांच्या योजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

On: January 6, 2026 2:23 PM
Follow Us:
Devendra Fadnavis | पुण्यात 80 हजार कोटींच्या विकासकामांच्या योजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
--Advertisement Here--

पुणे : Devendra Fadnavis यांनी पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात सुमारे 80 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. पुण्यातील कात्रज चौक येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहरातील आमदार तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत भाजप सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला. त्यामुळे टीका करणाऱ्या विरोधकांनी वस्तुस्थिती तपासावी, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने पुण्यासाठी भरीव आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार केला असल्याचेही (Devendra Fadnavis) त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रो, पाणीपुरवठा, नदी सुधार व वाहतूक प्रकल्पांना गती – Devendra Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती देताना सांगितले की, पुणे मेट्रो चे 110 किमी मार्ग नियोजित असून त्यापैकी 31 टक्के काम पूर्ण झाले आहे, तर 24 किमी मार्ग अंतिम टप्प्यात आहे. 24×7 पाणीपुरवठा योजनेचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि 88 किमी नदी सुधार प्रकल्पामुळे पूरनियंत्रण व पर्यावरण संरक्षणास चालना मिळणार आहे. शहरासाठी सुमारे 44 हजार कोटींचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

उड्डाणपूल, रिंग रोड व Intelligent Traffic System ने वाहतूक कोंडी कमी होणार – Devendra Fadnavis

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, 54 किमी भुयारी मार्ग, तसेच Intelligent Traffic System राबविण्यात येणार आहे. यासोबतच AI आधारित CCTV यंत्रणा, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत भाजपने ठोस विकासकामे केली असून त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध निवडणुकांत पुणेकरांनी भाजपला सातत्याने पाठिंबा दिला आहे. आगामी काळात पुणे शहराचे विस्तारीकरण होणार असल्याने दूरदृष्टी ठेवून नियोजन आवश्यक आहे. पुणेकर आता विरोधकांना सत्तेत येण्याची संधी देणार नाहीत आणि पुन्हा एकदा पुण्याचा महापौर भाजपचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवार हे अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्या काळात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत सरकार होते. मात्र, त्या काळात अपेक्षित भरीव विकास झाला नाही. मागील निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर सलग पाच वर्षे दोन्ही शहरांत विकासकामे वेगाने सुरू झाली. आज विकासाच्या मुद्द्यावर भाजपवर टीका करणाऱ्यांनी आपल्या कार्यकाळाचा हिशेब जनतेला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment