Pune : पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान (Drunk and Drive) करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध तीन दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या २०१ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
Drunk and Drive साठी 30 ठिकाणी नाकाबंदी, 3 दिवस तपासणी
दिनांक 19 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत पुणे शहरातील विविध भागांमध्ये एकूण 30 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारून वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान मद्यपान करून वाहन चालवणारे चालक आढळून आल्याने त्यांच्यावर मोटार वाहन कायद्या नुसार दंड व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पुणे शहर वाहतूक विभाग पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यप्राशन (Drunk and Drive) करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.








