--Advertisement Here--

Fursungi-Uruli Devachi नगरपरिषद निवडणूक: प्रभाग क्रमांक 5 मध्ये ‘कामठे’ भावकीची सर्वात रंगतदार लढत

On: December 25, 2025 3:42 PM
Follow Us:
Fursungi-Uruli Devachi नगरपरिषद निवडणूक: प्रभाग क्रमांक 5 मध्ये ‘कामठे’ भावकीची सर्वात रंगतदार लढत
--Advertisement Here--

Fursungi-Uruli Devachi नगरपरिषदेसाठी पहिल्यांदाच निवडणूक, 150 हून अधिक उमेदवार रिंगणात

फुरसूंगी–उरुळी देवाची Fursungi-Uruli Devachi नगरपरिषदेची नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची ही पहिलीच निवडणूक असून, राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत 150 हून अधिक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते प्रभाग क्रमांक 5 ने.

प्रभाग 5 मध्ये सहा ‘कामठे’ उमेदवार आमनेसामने

Fursungi-Uruli Devachi प्रभाग क्रमांक 5 मध्ये भावकीची लढत चांगलीच तापली आहे. खुल्या प्रवर्गातून राहुल बाजीराव कामठे, गणेश मधुकर कामठे, सचिन गुलाब कामठे, नितीन मधुकर कामठे, ओंकार मछिंद्र कामठे आणि इशान जग्गू कामठे असे तब्बल सहा ‘कामठे’ आडनावाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याशिवाय अतुल हरपळे हेही इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत तुल्यबळ आणि चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

Pune Local Body Election Result 2025: बारामतीसह पाच नगर परिषदांसाठी ६३.२ टक्के मतदान

प्रभागातील राखीव जागांवरही चुरस

या प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार असून,

  • एक जागा खुल्या प्रवर्गासाठी
  • दुसरी जागा अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव आहे.

अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गातून विजया बलभीम कांबळे आणि संगीता गोविंद सूर्यवंशी ही दोन नावे सध्या रिंगणात असल्याचे दिसून येत आहे. हा प्रभाग सर्वात मोठा असून येथे सुमारे 4800 मतदार आहेत.

भाजप–शिवसेना आमनेसामने, राष्ट्रवादी अजित पवार गट शांत

फुरसूंगी–उरुळी देवाची Fursungi-Uruli Devachi ही दोन्ही गावे पुरंदर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संदीप हरपळे आणि बाजीराव सायकर निवडणुकीची धुरा सांभाळत आहेत.

दुसरीकडे माजी आमदार व भाजप नेते संजय जगताप यांनीही ताकद लावली असून संजय हरपळे आणि धनंजय कामठे हे भाजप पॅनलचे नेतृत्व करत आहेत. सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मात्र येथे परस्परविरोधात उभे ठाकले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अद्याप ठोस हालचाल दिसत नसली, तरी भाजपसोबत युती करून काही जागा मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून विशाल हरपळे नेतृत्व करत असून चार ते पाच जागांवर उमेदवार देण्याची तयारी आहे.

नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (पुरुष) साठी राखीव

Fursungi-Uruli Devachi नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (पुरुष) साठी राखीव असून ही निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. यासाठी तानाजी अडागळे आणि किरण सरोदे हे प्रमुख इच्छुक आहेत.

विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचे लक्ष

राहुल कामठे यांनी मतदारांसाठी आदमपूर व कोल्हापूर देवदर्शन यात्रा आयोजित केल्यामुळे ते सध्या प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तसेच त्यांनी स्वखर्चातून अनेक विकासकामे केल्याचा दावा केला आहे.

फुरसूंगी व उरुळी देवाची Fursungi-Uruli Devachi ही गावे पूर्वी महानगरपालिकेच्या अखत्यारीत होती. 2017 मध्ये फुरसूंगी महानगरपालिकेत समाविष्ट झाले होते. मात्र लोकसंख्या वाढूनही गेल्या सहा वर्षांत मूलभूत सुविधा आणि विकासकामांचा अभाव राहिला. त्यामुळे यावेळी विकासासाठी कटिबद्ध उमेदवारालाच मतदार पसंती देतील, असे चित्र आहे.

निवडणूक कार्यक्रम

  • 10 नोव्हेंबर: उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
  • 17 नोव्हेंबर: अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
  • 18 नोव्हेंबर: अर्जांची छाननी
  • 25 नोव्हेंबर: अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख
  • 2 डिसेंबर: मतदान
  • 3 डिसेंबर: निकाल जाहीर

Nagarpalika Nagarparishad Nagarpanchayat Winner : गावचे कारभारी ठरले! 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment