Fursungi-Uruli Devachi – संतोष सरोदे नगराध्यक्ष.?
फुरसुंगी–उरुळी देवाची Fursungi-Uruli Devachi नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी घवघवीत यश मिळवत 32 पैकी 19 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयासह राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष सरोदे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या Fursungi-Uruli Devachi निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ला 8 जागा तर भारतीय जनता पार्टीला 5 जागांवर समाधान मानावे लागले. एकूण 8 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली.
Fursungi-Uruli Devachi नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने ती अत्यंत चुरशीची ठरली. Fursungi-Uruli Devachi नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी 120 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी सर्व 32 जागांवर उमेदवार उभे केले होते. Fursungi-Uruli Devachi एकूण 16 वार्डांमध्ये निवडणूक झाली असून नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते.
मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली. सुरुवातीपासूनच अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. निकाल धक्कादायक ठरले असून अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला आहे. Fursungi-Uruli Devachi नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संतोष सरोदे यांना 20,908 मते, तर शिवसेना (शिंदे गट) चे महेंद्र सरोदे यांना 18,010 मते मिळाली. उबाठा शिवसेनेचे सनी कांबळे यांना 6,055 मते मिळाली.







