चिखली, पुणे : पुण्यातील चिखली परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी भीषण ‘हिट अँड रन’ (Hit and Run) ची घटना समोर आली असून, देहू–आळंदी रोडवरील जाधववाडी येथील रिव्हर चौकात भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर चालक मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला आहे.
Hit and Run नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहिती नुसार, Hit and Run ही घटना २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजता घडली. फिर्यादी महिला व त्यांचे पती त्यांच्या टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीवर (MH 09 CT 1060) प्रवास करत होते. जाधववाडी येथील रिव्हर चौकात सिग्नल लागल्याने ते थांबले असताना, पाठीमागून आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने (MH 14 MT 5266) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
पती गंभीर जखमी
धडकेचा जोर इतका भीषण होता की दुचाकीवरील पती रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
Hit and Run; माणुसकीला काळिमा: चालक फरार
अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळी थांबून जखमींना मदत करणे अपेक्षित असताना, त्याने अत्यंत बेजबाबदारपणा दाखवत ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात ट्रकचालकाविरोधात ‘हिट अँड रन’ (Hit and Run) सह गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू आहे.







