पुणे महानगरपालिका (PMC Elections 2026) निवडणुका जवळ येत असताना विमान नगर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये उमेदवार ऐश्वर्या पाथरे यांच्या वेगळ्या आणि परिणामाभिमुख प्रचार पद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे. पारंपरिक राजकीय आश्वासनांऐवजी त्यांनी कॉर्पोरेट व्यवस्थापन पद्धतीवर आधारित, व्यावसायिक विकास आराखडा मतदारांसमोर मांडला आहे.
व्यावसायिक क्षेत्राचा अनुभव असलेल्या तरुण नेत्या ऐश्वर्या पाथरे यांनी सादर केलेल्या जाहीरनाम्यात मोजता येणारी उद्दिष्टे, ठरावीक कालमर्यादा आणि अंमलबजावणीसाठी स्पष्ट यंत्रणा नमूद करण्यात आली आहे. या मुळे हा (PMC Elections 2026) जाहीरनामा इतर पारंपरिक निवडणूक जाहीरनाम्यांपेक्षा वेगळा ठरत आहे.
PMC Elections 2026 घोषणांपेक्षा निकालांवर भर
विमान नगर, लोहगाव आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन नागरी समस्यांवर नियोजन, अंमलबजावणी आणि नियमित आढावा या तत्त्वांवर आधारित उपाय सुचवण्यात आले आहेत. प्रत्येक कामासाठी जबाबदारी निश्चित करणे आणि प्रगती मोजण्याची यंत्रणा हा या जाहीरनाम्याचा मुख्य गाभा आहे.
(PMC Elections 2026) स्थानिक संवाद कार्यक्रमांदरम्यान ऐश्वर्या पाथरे म्हणाल्या,
“नागरिकांना फक्त घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष उपाय हवेत. आजच्या प्रशासनाला कार्यक्षम नियोजन आणि पारदर्शक अंमलबजावणीची गरज आहे.”
तरुण व आयटी व्यावसायिकांचा सकारात्मक प्रतिसाद
विशेषतः आयटी व्यावसायिक, तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये या डेटा-आधारित प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही हा जाहीरनामा चर्चेचा विषय ठरत असून, अनेकांनी त्याच्या व्यावहारिक आणि वास्तववादी दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.
📌 PMC Elections 2026 जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
- लोहगाव व वाघोलीतील मूलभूत सुविधांच्या समस्या ठरावीक वेळेत सोडवणे
- विमा नगर–लोहगाव मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते रुंदीकरण व सार्वजनिक वाहतूक सुधारणा
- अनधिकृत बांधकामांवर कारवाईसह नियोजित शहरी विकास
- दर सहा महिन्यांनी सार्वजनिक प्रगती अहवाल जाहीर करण्याची हमी
निवडणूक प्रचार अधिक तीव्र होत असताना, जबाबदारी, पारदर्शकता आणि मोजता येणारे निकाल यांवर आधारित ऐश्वर्या पाथरे यांचा हा व्यवस्थापन-केंद्रित दृष्टिकोन मतदारांच्या अपेक्षांना कितपत पूर्ण करतो, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
PMCElections2026 #AishwaryaPathare #VimanNagar #Ward3 #PunePolitics #PMCNews #LocalElections #PuneUpdates








