--Advertisement Here--

अधिक स्थळे, तोच भाडे! PMPML च्या पर्यटन बस मार्गांवर नव्या आकर्षणांची भर

On: December 26, 2025 9:48 AM
Follow Us:
अधिक स्थळे, तोच भाडे! PMPML च्या पर्यटन बस मार्गांवर नव्या आकर्षणांची भर
--Advertisement Here--

₹500 तिकिटात अधिक पर्यटन अनुभव; PMPL पुणे व परिसरातील ऐतिहासिक-धार्मिक स्थळांचा समावेश

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने आपल्या लोकप्रिय पर्यटन बस सेवेत (Tourist Bus Service) प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. तिकीट दरात कोणतीही वाढ न करता, काही निवडक पर्यटन बस मार्गांवर नवीन पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक ठिकाणे पाहण्याची संधी मिळणार आहे.

PMPML कडून सध्या सुरू असलेल्या पर्यटन बस सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हाच प्रतिसाद लक्षात घेऊन, प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी काही मार्गांवर अतिरिक्त ऐतिहासिक, धार्मिक आणि वारसास्थळे जोडण्यात आली आहेत.

रूट क्रमांक 6 मध्ये बदल

पर्यटन बस रूट क्रमांक 6 (पुणे स्टेशन – स्वारगेट – हडपसर – रामदरा – थेऊर गणपती) या मार्गावर आता यावत येथील डरेकर वाडा या ऐतिहासिक वास्तूचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना नव्या ठिकाणाचा अनुभव घेता येणार आहे.

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय

रूट क्रमांक 7 वरही नव्या स्थळांची भर

त्याचप्रमाणे रूट क्रमांक 7 मध्येही मोरेची चिंचोळी, पाबळ येथील पद्मावती जैन मंदिर, मस्तानी समाधी यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी तिकीट दर कायम ₹500 इतकाच ठेवण्यात आला आहे. कोणतीही अतिरिक्त शुल्क आकारण्यात आलेले नाही.

PMPML चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, “नागरिक आणि पर्यटकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता, पर्यटन बस सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. भविष्यात आणखी काही मार्गांवर सुधारणा करण्याचा विचार आहे.”

सध्या PMPML कडून १३ पर्यटन बस मार्ग चालवले जात असून, तिकिटे स्वारगेट, डेक्कन जिमखाना, हडपसरसह विविध पास केंद्रांवर उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे पुणे व आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक सहजपणे पाहता येणार असून, PMPML ची पर्यटनाभिमुख सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक बळकट होणार आहे.

प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar) पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment