--Advertisement Here--

Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना

On: February 8, 2026 8:40 AM
Follow Us:
Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना
--Advertisement Here--

हडपसर: पुण्यातील हडपसर मध्ये काल दुपारी पावणे बारा वाजता एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझम खान (वय ३८, रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून,गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हांडेवाडी चौकाजवळ एका हॉटेलसमोर काल दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकी चालक खान हे उंड्रीकडून मंतरवाडीच्या दिशेने जात होते. एका हॉटेलसमोर वळण घेताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणी फुरसुंगी पोलिस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Pune Metro: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! 23.3 कि.मी.ची तिसरी मेट्रो मार्गिका ‘या’ तारखेला सुरू होणार; वाहतूक कोंडीतून कायमची सुटका

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment