Pune Metro: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार!
पुणेकरांसाठी (Pune Metro) दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे शहरात मेट्रो लाईन 1 आणि मेट्रो लाईन 2 या दोन मार्गिकांवर सेवा सुरू आहे. वाढती (Pune Metro 3) लोकसंख्या, खासगी वाहनांची संख्या आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे मेट्रो विस्ताराची (Pune Metro Update) गरज अधिक तीव्र झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात तिसरी मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो लाईन 3 मार्च 2026 पासून प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)
सध्या मेट्रो लाईन 3 संदर्भात अधिकृत उद्घाटनाची तारीख जाहीर झालेली नसली तरी काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. सुमारे 23.3 किलोमीटर लांबीची ही मार्गिका हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणार आहे. या मार्गिकेमुळे विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क थेट शहराशी जोडले जाणार असल्याने दररोजचा प्रवास अधिक सोपा आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
Sanjeev Kapoor Net Worth 2025: यहाँ से देखिए कितनी सम्पत्ति के मालिक हैं शेफ़ संजीव कपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम वेळेत पूर्ण करून 31 मार्च 2026 पर्यंत सेवा सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या मार्गिकेचा सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाजवळ सध्या कार्यरत असलेल्या मेट्रो लाईन 1 आणि लाईन 2 शी स्कायवॉकद्वारे संपर्क केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मार्ग बदलताना अधिक सोय होणार असून सिव्हिल कोर्ट स्थानक हे महत्त्वाचे जंक्शन ठरणार आहे.
दरम्यान, पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी केंद्र सरकारकडून आणखी दोन महत्त्वाच्या मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि खराडी ते खडकवासला या मार्गांच्या विस्ताराला हिरवा कंदील मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गाचे काम वेगाने सुरू असून सप्टेंबर 2026 पर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. स्वारगेट ते कात्रज हा भूमिगत मेट्रो मार्ग काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या रखडलेला आहे.
या शिवाय रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक या मार्गांचे कामही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील टप्प्यात वडगाव ते कात्रज, वडगाव ते चाकण, खराडी ते पुणे विमानतळ, शिवाजीनगर ते कोंढवा, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड रेल्वे अशा नव्या मार्गांसाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. पुणे मेट्रोचा हा विस्तार पूर्ण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Sanjeev Kapoor Net Worth 2025: यहाँ से देखिए कितनी सम्पत्ति के मालिक हैं शेफ़ संजीव कपूर






