--Advertisement Here--

पुणे; ‘SK Trophy’ आंतर-क्लब अंडर-13 टी-20 क्रिकेट स्पर्धा

On: January 10, 2026 6:20 AM
Follow Us:
पुणे; 'SK Trophy' आंतर-क्लब अंडर-13 टी-20 क्रिकेट स्पर्धा
--Advertisement Here--

णे, 9 जानेवारी 2026 : पुणे क्रिकेट अकॅडमी आणि सागर कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘SK Trophy’ आंतर-क्लब अंडर-13 टी-20 क्रिकेट स्पर्धेत Specialized Cricket Club संघाने शानदार कामगिरी करत पुणे पोलीस बॉईज संघावर 5 गडी राखून विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. या अंतिम सामन्यात स्पेशलाइज्ड क्रिकेट क्लबच्या Sankarsan Khandekar याने नाबाद 90 धावांची झंझावाती खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

शनिवारी सातारा रोडवरील टेंभेकर फार्म्स क्रिकेट अकॅडमी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पुणे पोलीस बॉईज संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 1 बाद 203 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. विराट भिसे याने 53 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 118 धावा केल्या, तर वेदांत मावस्कर याने 44 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले.

203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पेशलाइज्ड क्रिकेट क्लबने केवळ 16.5 षटकांत 5 गडी गमावत 204 धावा करत सामना जिंकला. संकरसन खांडेकर याने 28 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 90 धावांची अफलातून खेळी केली. त्याला अमर कामत (44 धावा), जैद काझी (23 धावा) आणि स्टीफन शिरोडकर (नाबाद 16 धावा) यांनी उत्तम साथ दिली.

SK Trophy पारितोषिक वितरण सोहळा व सामन्याचा थोडक्यात आढावा

SK Trophy स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पुणे पोलीस (CID) अधिकारी श्री. डेंगळे आणि पुणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश मोकाशी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्पर्धा संचालक सागर कांबळे, विवेक भागवत आणि सागर सांगळे उपस्थित होते.

सामन्याचा संक्षिप्त निकाल :

  • पुणे पोलीस बॉईज : 20 षटकांत 1 बाद 203 धावा
    (विराट भिसे 118 नाबाद, वेदांत मावस्कर 52; अनुज शराडे 1-31)
  • स्पेशलाइज्ड क्रिकेट क्लब : 16.5 षटकांत 5 बाद 204 धावा
    (संकरसन खांडेकर 90 नाबाद, अमर कामत 44, जैद काझी 23, स्टीफन शिरोडकर 16 नाबाद; नील सोलापूर 1-22)

सामनावीर पुरस्कार : Sankarshan Khandekar

वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी (Women National Boxing Championship) महाराष्ट्र संघ जाहीर..

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment