--Advertisement Here--

वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी (Women National Boxing Championship) महाराष्ट्र संघ जाहीर..

On: December 26, 2025 11:35 AM
Follow Us:
Women National Boxing Championship
--Advertisement Here--

पुणे: नोएडा (उत्तर प्रदेश) येथे ४ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या ९ व्या (Senior Women National Boxing Championship) वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. हा संघ निवडण्यासाठी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन च्या वतीने पुण्यातील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती.

National Boxing Championship निवड समितीची भूमिका

या निवड चाचणीतून महाराष्ट्राचा वरिष्ठ महिला बॉक्सिंग संघ महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव भरतकुमार व्हावळ आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव यांच्या द्विसदस्य निवड समितीने घोषित केला आहे.

महाराष्ट्र वरिष्ठ महिला बॉक्सिंग संघ (Senior Women National Boxing Championship) (वजनगटानुसार)

  • ४५–४८ किलो: नितू सुतार (पिंपरी-चिंचवड शहर)
  • ४८–५१ किलो: हर्षदा लोहाट (पुणे शहर)
  • ५१–५४ किलो: प्रगती पाटील (सांगली जिल्हा)
  • ५४–५७ किलो: अनिता औजी (पुणे शहर)
  • ५७–६० किलो: प्राजक्ता शिंदे (धुळे जिल्हा)
  • ६०–६५ किलो: पूजा पाटील (कोल्हापूर शहर)
  • ६५–७० किलो: श्रुती सोनवणे (जळगाव जिल्हा)
  • ७०–७५ किलो: सायली अहिरे (नाशिक जिल्हा)
  • ७५–८० किलो: सई डावखर (पुणे शहर)

Senior Women National Boxing Championship संघाला शुभेच्छांचा वर्षाव

निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे व्यवस्थापकीय सचिव महेश सकपाळ, रेफरी जज कमिशन चेअरमन एकनाथ चव्हाण, सचिव अभिमान सूर्यवंशी, कोचेस कमिशन चेअरमन विजय गुजर, तसेच पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे आणि सुरेशकुमार गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.

निवड चाचणीत पंचांचे योगदान

या निवड चाचणी प्रक्रियेत सनी परदेशी, आसिफ शेख, मनोज यादव, चेतना वारे, प्रदीप वाघे यांच्यासह इतर पंचांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment