नोकरीच्या दैनंदिन कटकटीतून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात. जर तुम्हालाही स्वतःचा बॉस बनायचे असेल, तर Amul Company तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. अमूल दूध व दुग्धजन्य पदार्थांची फ्रँचायझी सुरू करून चांगली कमाई करण्याची संधी देत आहे.
अमूलची फ्रँचायझी घेऊन व्यवसाय कसा सुरू करता येईल आणि त्यातून किती नफा मिळू शकतो, याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
केवळ 2.6 लाख रुपयांत Amul व्यवसायाची सुरुवात
आजकाल साधी चहाची टपरी सुरू करण्यासाठीही लाखो रुपयांची गुंतवणूक लागते. मात्र अमूलसोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता नाही. अवघ्या 2 ते 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही अमूलचा स्वतःचा आऊटलेट सुरू करू शकता.
Amul कडून मुख्यत्वे दोन प्रकारच्या फ्रँचायझी दिल्या जातात.
1) अमूल प्रेफर्ड आऊटलेट
या प्रकारच्या फ्रँचायझीसाठी 2 ते 2.6 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
- 100 ते 150 स्क्वेअर फूट जागा आवश्यक
- 25,000 रुपये रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट
- 1 लाख रुपये रिनोव्हेशनसाठी
- 75,000 रुपये उपकरणांवर खर्च
2) आइस्क्रीम स्कूपिंग पार्लर
जर तुमच्याकडे सुमारे 6 लाख रुपयांचे भांडवल आणि चांगली जागा असेल, तर तुम्ही अमूलचे आलिशान आइस्क्रीम पार्लर सुरू करू शकता.
- 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट
- उर्वरित रक्कम दुकान सजावट आणि मशीनरीसाठी खर्च होते
कमाई आणि नफ्याची माहिती
अमूल फ्रँचायझीची सर्वात मोठी खासियत म्हणजे कंपनीला कोणतीही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंग द्यावी लागत नाही. जितकी विक्री होईल, तितका संपूर्ण नफा फ्रँचायझीधारकाला मिळतो.
अमूलच्या माहितीनुसार, दुकान योग्य ठिकाणी असल्यास दरमहा 40,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे.
प्रोडक्ट्सवर मिळणारे कमिशन
- दूध पाऊचवर – 2.5%
- दूधजन्य पदार्थ (पनीर, तूप, लोणी) – 10%
- आइस्क्रीम – 20%
- रेसिपी-आधारित पदार्थ (शेक, सँडविच) – 50% पर्यंत
अमूलची फ्रँचायझी कशी घ्यावी?
अमूलची फ्रँचायझी घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अर्ज करण्यासाठी अमूलच्या अधिकृत वेबसाईट www.amul.com ला भेट द्यावी.
⚠️ इंटरनेटवर अमूलच्या नावाने अनेक बनावट वेबसाईट्स आहेत. अमूल कंपनी कधीही ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या नावाखाली पैसे मागत नाही, याची नोंद घ्यावी.
अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दुकानाची कागदपत्रे किंवा रेंट अॅग्रीमेंट
- बँक खात्याची माहिती
Also Read :
Bihar SSC Recruitment 2025: Important Dates, Registration Process से सम्बंधित पूरी जानकारी











