Monsoon 2026 Updates; यंदा पाऊस लवकर येणार; उष्णतेतून मोठा दिलासा

On: April 27, 2026 12:42 PM
Follow Us:
Monsoon 2026 Updates; यंदा पाऊस लवकर येणार; उष्णतेतून मोठा दिलासा

Monsoon 2026 Update : देशभरात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना, मान्सून 2026 संदर्भात एक सकारात्मक आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा आधी येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

अंदमानपासून केरळपर्यंत लवकर आगमनाचे संकेत

हवामान (Monsoon 2026 Update) अंदाजानुसार, 18 ते 25 मे दरम्यान मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो केरळ किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. साधारणपणे जूनच्या सुरुवातीला येणारा मान्सून यंदा काही दिवस आधीच सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनुकूल हवामानामुळे पावसाची गती वाढणार

तज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली अनुकूल परिस्थिती आणि वाढलेली आर्द्रता यामुळे मान्सूनच्या हालचाली वेगवान होत आहेत. या घटकांमुळे पावसाचे आगमन लवकर होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत तापमान 40 ते 44 अंशांच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत मान्सून लवकर येणार ही बातमी बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.

यंदा (Monsoon 2026 Update) मान्सूनचा एकूण कालावधी आणि पावसाचे प्रमाण कसे राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान खात्याच्या पुढील अंदाजानुसारच याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment